जागतिक हृदय दिनानिमित्त, वीर वाजेकर महाविद्यालयात सीपीआर कार्यशाळा संपन्न.


उरण:सुनिल ठाकूर 
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजे कर ए एस सी महाविद्यालय पुणे येथे सी. पी. आर. (Cardiopulmonary Resuscitation) विषयावरील अतिथी व्याख्यान आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयातील तज्ज्ञांच्या पथकाने महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना सीपीआरचे सैद्धांतिक मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष हाताळणीद्वारे प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी केली.महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांना सीपीआर (हृदय-फुफ्फुस पुनर्जीवन) या आपत्कालीन जीवनरक्षक तंत्राचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर अपोलो रुग्णालयातील तज्ज्ञांनी सीपीआरची पाच टप्प्यांमध्ये करण्यात येणारी जीवनरक्षक प्रक्रिया विद्यार्थ्यांना सविस्तरपणे समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सीपीआर तंत्र आत्मसात केले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. संदीप घोडके, आरोग्य केंद्र समितीच्या अध्यक्षा डॉ. श्रेया पाटील, श्री. यशवंत गायकवाड, श्री. संतोष देसाई तसेच श्री. योगेश कुलकर्णी उपस्थित होते. तज्ज्ञांच्या पथकाने विद्यार्थ्यांना सीपीआर (हृदय-फुफ्फुस पुनर्जीवन) हे जीवनरक्षक तंत्र अवगत असण्याचे महत्त्व आणि आजच्या परिस्थितीत त्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत गरजू व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येकाने सीपीआरसारख्या आपत्कालीन जीवनरक्षक तंत्राचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनाही सीपीआरचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.
याशिवाय तू. ह. एच. वाजेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठीही सीपीआर विषयावरील अतिथी व्याख्यान आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये प्राचार्य बबन साळुंखे, थोरात मॅडम, प्रा. पाटोळे, प्रा. किशोर पाटील प्रा. देवरे प्रा. खेडकर एच एन पाटील सर यांनी मोलाचे सहकार्य केले. "हृदयाच्या प्रत्येक स्पंदनासाठी"  उपक्रमाद्वारे एकूण १,२०९ सहभागी लाभार्थ्यांनी सीपीआरचे प्रत्यक्ष प्रशिक्षण व  सीपीआर शपथ घेतली. या सीपीआर प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रमात विक्रमी संख्येने सहभागी झाल्याबद्दल अपोलो रुग्णालय, नवी मुंबई यांच्या वतीने महाविद्यालयाचा 'सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स' प्रदान करून गौरव करण्यात आला.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.