प्रतिशिर्डी शिरगाव साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
उरण:सुनिल ठाकूर दिवंगत माजी आमदार प्रकाश देवळे यांनी स्थापन केलेल्या प्रतिशिर्डी शिरगाव श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती कार्यकारी विश्वस्त विभावरी देवळे-जाधव यांनी दिली. उत्सवाची सुरुवात श्री साईबाबांच्या महाभिषेकाने झाली. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. दुपारी आयोजित 'स्वर ज्ञानेश्वरी' कार्यक्रमात गायिका ज्ञानेश्वरी गाडगे, तबलावादक पांडुरंग पवार, हार्मोनियमवादक कार्तिकी गाडगे आणि पंडित रमेश भुजबळ यांनी सुरेल सादरीकरण केले. त्यानंतर अभंगवाणी कार्यक्रमात गायक शंकर गिरी, तबलावादक पांडुरंग पवार, हार्मोनियमवादक अभय नलगे तसेच कोरस कलाकार किरण चोरमारे आणि सचिन जाधव यांनी संतवाणी व अभंगांचे सादरीकरण करून वातावरण भक्तिमय केले. सायंकाळी श्री साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक मं...