वहाळला भरली साई भक्तांची शाळा गुरु पौर्णिमेत साईंच्या नावाचा गजर



उरण:सुनिल ठाकूर 

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही वहाळ येथील साई संस्थांनच्या साई मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठया उत्साहात आणि दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रथेप्रमाणे सकाळी साई बाबांचे मंगल स्नान गुरुवर्य मो.का.मढवी गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महापूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी दिवसभर साईंच्या दर्शनाला भाविकांची  गर्दी दिसून आली. सायंकाळी उरण तालुक्यातील साई भक्तांची चिरनेर ते वहाळ साई मंदिर अशा पायी दिंडीचे साई मंदिरात प्रस्थान झाले. साई भक्तांच्या हातात भगव्या पताका आणि आणि साईंच्या नावाचा गजर दिंडीतून होताना दिसत होता. त्यामुळे संपूर्ण वहाळ परिसर साईमय झाला होता. यावेळी साई भक्तांनी महाआरती करून महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान यावेळी गुरुजनानाचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे बॉक्ससिंग मध्ये रायगड पनवेल चम्पियन स्पर्धेत गोल्ड मेडल पटकवणाऱ्या कु.आस्था सचिन भगत आणि तिच्या परिवाराचा तसेच हरेश्वर ठाकूर यांच्या साई ग्रुपने अमरनाथ यात्रा पूर्ण केल्याबद्दल त्यांच्याही ग्रुपचा साई संस्थांनचे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता बोरखार येथील संगीत भजन गायिका प्रियाशी श्रीकांत डाकी हिने गायलेल्या अवघाची रंग एकची झाला. या सुमधुर गीताने झाली.या कार्यकमाच्या यशस्वी आयोजनासाठी  साई संस्थान वहाळ परिवाराच्या सभासदांनी जीवतोड मेहनत घेतली.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.