पुणे येथील नदीपात्र स्वच्छतेसाठी ‘जाळी आणि निर्माल्य कलश’ प्रस्तावाला उपसूचनेसह मंजुरी.

उरण : सुनिल ठाकूर 

प्रभाग क्र. २५ च्या नगरसेविका सौ. स्वप्नाली पंडित यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले होते की, नदीपात्रात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर निर्माल्य आणि कचरा टाकला जातो. त्यासाठी नदीवरील पुलांवर उंच जाळ्या बसवाव्यात, जेणेकरून वरून टाकला जाणारा कचरा थेट नदीत जाणार नाही.   पुलाच्या दोन्ही बाजूस निर्माल्य कलश ठेवावेत, जेणेकरून नागरिक निर्माल्य त्यातच टाकतील.
या मूळ प्रस्तावावर चर्चा करताना समिती सदस्य श्रीकांत जगताप यांनी उपसूचना मांडली.  सपना छाजेड यांनी त्याला अनुमोदन दिले.
उपसूचनेनुसार, “पुणे महानगरपालिका हद्दीतील नदीपात्रांवर तसेच कॅनॉलवर जाळ्या बसविण्यात याव्यात व निर्माल्य कलश बसवावेत. तसेच कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.”
म्हणजेच आता ही योजना केवळ प्रभाग २५ पुरती मर्यादित न राहता संपूर्ण शहरातील नदीपात्र आणि कॅनॉल साठी लागू होणार आहे. तसेच केवळ सुविधा पुरवून न थांबता कचरा टाकणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची तरतूदही जोडण्यात आली आहे.

नदी आणि कॅनॉल प्रदूषण रोखण्यासाठी तसेच धार्मिक निर्माल्याचे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी हा निर्णय नागरिकाभिमुख ठरणार असल्याचे समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी सांगितले.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.