बोरी उरण येथे नागरी संरक्षण दल प्राथमिक पाठयक्रम शिबीर संपन्न.

उरण :सुनिल ठाकूर 
महाराष्ट्र शासन गृह विभाग विशेष
नागरिक संरक्षण दल उरण रायगड यांच्यामार्फत *नागरिक संरक्षण प्राथमिक पाठ्यक्रम* 

दिनांक 12 मार्च 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये पाच दिवसाचे प्रशिक्षण संपन्न झाले. 
   या प्रशिक्षणामध्ये *प्रथमोपचाराची तत्वे आणि पायऱ्या, हवाई हल्ला सूचना प्रणाली, नागरी संरक्षण सेवा, संघटना, आग आणि आगीची तत्वे, दोर व गाठींचे प्रकार, आपत्कालीन विमोचन पद्धती, बँडेजचे प्रकार तसेच बँडेज बांधण्याच्या पद्धती, श्वासावरोध व कृत्रिम श्वसन पद्धती, पाण्यात बुडलेल्या व्यक्तीला धुराच्या खोलीतून बाहेर काढलेल्या व्यक्तीला तसेच इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या बेशुद्ध व्यक्तीला शुद्धीवर आणण्याचा पद्धती, माणूस बेशुद्ध झाल्यावर, मानसिक ताण तणाव , शारीरिक ताण तणाव येऊ नये म्हणून काय करायला हवे, हृदयविकार आल्यास त्याला कोणत्या पद्धतीने शुद्धीवर आणायचा इत्यादी  यापद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.*
      आपत्तीच्या काळात तसेच संकट कालीन परिस्थिती असल्यास नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवकाने कशा रीतीने नागरिकांना मदत केली पाहिजे, नागरिकांचे मनोबल कसे टिकवून ठेवले पाहिजे याबाबतचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आले हे प्रशिक्षण आयोजन करण्याकरता *माननीय श्री हरेश्वर ठाकूर विभागीय क्षेत्ररक्षक यांनी मेहनत घेतली, माननीय श्री शशिकांत शिरसाट सर सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण दल उरण, श्री दौलत पाटील* सक्रिय स्वयंसेवक ह्यांनी प्रत्येक दिवशी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले, श्री. दत्ताराम गोंधळी उपमुख्य क्षेत्ररक्षक, श्री समीर थळी, श्री नितेश घरत, भूमी मोकल, उत्कर्षा गावंड, रेशम कोळी, कांशिता म्हात्रे, आयुष मोहिते, शुभम वीर, गौरव डांगे, मनाली पाटील, भाविक पाटील, प्रतीक तांडेल, यशश्री राव, मानसी वर्तक, वैष्णवी वर्तक, समीक्षा ठाकूर तसेच पेण तालुक्यातील राजेश म्हात्रे *ह्या सर्वांनी मार्गदर्शन करून नागरी संरक्षण दलातील कर्तव्य व जबाबदारी याबाबत माहिती करून दिली.*

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.