साई मंदिराचा 14 वा वर्धापन दिन मोठ्या उत्सहात संपन्न. साई बाबांच्या दर्शना साठी साई भक्तांची मांदियाली.

उरण : सुनिल ठाकूर 
गुरुवार 19/3/2026 रोजी गुढी पाडवा निमित्त श्री साई मंदिर साई नगर वहाळ चा 14 वा वर्धापन दिन मोठया उत्सहात संपन्न झाला.
 गुरुवार दिनांक 19/3/2026 रोजी सकाळी 6.30 वाजता साई बाबांचे मंगल स्नान -श्री मंजित काथोर पाटील यांच्या हस्ते.सकाळी 7 वाजता महा आरती.व साई बाबा अष्टोतर शत नामावली जप.सकाळी 10 ते 12 आई एकविरा भजन मंडळ डोंबिवली,कल्याण यांचे संगीत भजन -दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती.दुपारी 12.30 ते 2 महा प्रसाद-अन्नदाते स्व.धनाजी शेठ काथोर पाटील (वहाळ )यांच्या   स्मरणार्थ पाटील परिवार.संध्याकाळी 4 ते 6 - भैरवी अध्यात्मिक सेवा भावी मंडळ केळवणे यांचे हरिपाठ.संध्याकाळी 6 वाजता धूप आरती.संध्याकाळी 7 ते 9 साईच्छा सूर संगम निर्मित आगरी कोळी संगीत रत्न दिगंबर कोळी प्रस्तुत साई गीतांचा बहारदार नजराणा.
तर कार्यक्रमाची सांगता पालखी सोहळ्याने झाली.या पालखी सोहळ्यात स्व.वामन बुवा कडू (सोनारी )यांचे श्री रत्नेश्वरी साई प्रेरणा भजन मंडळ सामील होते
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आदर्श नागराध्य जे. एम. म्हात्रे, अरूण शेठ भगत, वाय टी देशमुख , प्रितम म्हात्रे, नारायणशेठ घरत, रंजना वासकर ( सभापती पनवेल पं समिती),भुपेंद्र पाटील( उप सभापती (पनवेल पं. समिती),निकिता खारकर( जि.प. सदस्या रायगड). जिज्ञासा कोळी (पनवेल पं. समिती सदस्या ), वितेश म्हात्रे (पनवेल पं. समिती सदस्य).हिरमुखे साहेब.साई देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील,सौ.पार्वती ताई पाटील,जगनशेठ पाटील,बाळाराम पाटील,अरुण दापोलकर,जगदीश पारिंगे,मो.का.मढवी,शिरीष कडू,विश्वास पाटील,अनंत पाटील,अखिलेश यादव,श्रीकांत मुंबईकर,पुजारीखरे गुरुजी,सुयोग खरे,गणेश पाटील, एकनाथ ठाकूर,विनय जाधव आदी सह साई भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.