चिरनेर गटात महा आघाडी चे उमेदवार अँड. अविनाश ठाकूर, कविता पाटील यांना वाढता पाठिंबा.


उरण: सुनिल ठाकूर
उरण तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचू लागले आहेत. मात्र मतदार हा राजा आहे. कुणाच्या पारड्यात मत टाकायचे हे मतदारावर अवलंबून आहे. काँग्रेस,शिवसेना,शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे महाविकास आघाडीचे चिरनेर जिल्हा परिषद गटातील अधिकृत उमेदवार अँड.अविनाश विजय ठाकूर तर चिरनेर पंचायत गणातून कविता रुपेश पाटील या निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत.
ऍड. अविनाश ठाकूर पेशाने वकील असल्याने त्यांना कायदयाचे योग्य असे ज्ञान आहे.याशिवाय या आधी ग्रुप ग्रामपंचायत पिरकोनचे उपसरपंच पद भुषविले असल्याने त्यांना राजकीय अभ्यासाचा अनुभव आहे.

कोप्रोली गावच्या रहिवाशी असलेल्या कविता पाटील यांनी कोप्रोली ग्रामपंचायतीमध्ये निवडून येऊन गावाच्या विकासकामांना हातभार लावला आहे. याशिवाय कविता पाटील यांचे पती रुपेश पाटील हे उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात मागील अनेक वर्षे सातत्याने सक्रिय सहभागी होत असल्याने त्यांच्या कार्याची दाखल घेऊन येथील मतदार त्यांना या निवडणुकीत तारतील यात शंका नाही.दोन्ही उमेदवार विविध क्षेत्रातील तरुणांत मिळून मिसळून राहत आहेत. विशेष म्हणजे सर्वांच्याच सुखदुःखात हिसहिरीने सहभाग घेऊन योग्य तो मदतीचा हात पुढे करत असल्याने त्यांच्या दातृत्वाची स्थानिक मतदारांना जाण असल्यानेच तरुण मतदार हे अँड अविनाश ठाकूर व कविता पाटील यांना मतदारांचा अधिक पाठिंबा मिळत आहे.

 त्यातच या मतदार संघात 5 पक्षाच्या आघाडीमुळे त्यांचे पारडे अधिक जड आहे. एक उच्च शिक्षित तरुण उमेदवार जर शिवतीर्थवर निवडून गेला तर या मतदार संघातील मतदारांना जे गढूळ पाणी प्यावे लागत आहे. ते पाणी पिण्याची वेळ तरी अँड अविनाश ठाकूर सारख्या लोक प्रतिनिधी येऊ देणार नाही. हिच भावना आजच्या तरुण मतदारांमध्ये असल्याने अँड. अविनाश ठाकूर यांना चिरनेर जि.प.मतदार संघातून विविध क्षेत्रातील तरुण मतदार जाहीर पाठिंबा देत त्यांच्या प्रचारार्थ संपूर्ण मतदार संघ पिंजून काढत आहेत.मात्र दोन्ही उमेदवार हे तुल्यबल्य असल्याने येथिल मतदार हा मात्र योग्यच उमेदवारांची निवड करील.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.