भारत-जगभरातील दिग्गज डॉक्टर्स, रुग्ण सुरक्षा तज्ज्ञ, आरोग्य धोरणकर्ते एकाच व्यासपीठावर आल े'इंटरनॅशनल हेल्थ डायलॉग २०२६' रुग्ण सुरक्षेसाठी जागतिक परिषद


उरण :सुनिल ठाकूर
  'इंटरनॅशनल हेल्थ डायलॉग (आयएचडी) २०२६' ला हैदराबादमध्ये सुरुवात झाली. या परिषदेनिमित्त भारत आणि जगभरातील दिग्गज डॉक्टर्स, रुग्ण सुरक्षा तज्ज्ञ, प्रमाणीकरण क्षेत्रातील जाणकार आणि आरोग्य धोरणकर्ते एकाच व्यासपीठावर आले आहेत. 'ग्लोबल वॉइसेस, वन व्हिजन' या संकल्पनेवर आधारित पहिल्या दिवसाचे सत्र प्रामुख्याने ' रुग्णांची सुरक्षा' या विषयावर केंद्रित होते. यामध्ये रुग्ण सुरक्षेला केवळ तांत्रिक विषय न मानता, ते नेतृत्व आणि सुशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अधोरेखित करण्यात आले. समान आरोग्य सेवा आणि जबाबदार डिजिटल परिवर्तनाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्यावर चर्चा झाली. या सत्रांमधून एक महत्त्वाची बाब समोर आली: मोठ्या स्तरावर आरोग्य सेवा पुरवताना भारताने मिळवलेला अनुभव आणि मानकांमध्ये केलेली सातत्यपूर्ण सुधारणा, आता रुग्ण सुरक्षेबाबतच्या जागतिक विचारांना नवी दिशा देत आहे. डॉ.संगीता रेड्डी या व्यासपीठाची वाढती जागतिक व्याप्ती अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, IHD 2026 साठी जगभरातील ७५ हून अधिक संस्थांकडून ५,००० पेक्षा जास्त नोंदणी, ३०० हून अधिक शोधनिबंध आणि पुरस्कारांसाठी प्रवेशिका १२० हून अधिक प्राप्त झाल्या आहेत.

विविध सत्रांमधून एक महत्त्वाचा विचार सातत्याने मांडला गेला, तो म्हणजे केवळ आजार झाल्यावर उपचार करण्याऐवजी, आजार होऊ नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर भर देणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर आरोग्य यंत्रणांवर येणाऱ्या दबावाबाबत बोलताना डॉ.संगीता रेड्डी यांनी नमूद केले की, "आरोग्य सेवांची मागणी झपाट्याने वाढत आहे. आपण वेगाने वाढणाऱ्या या गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण जुन्या किंवा साध्या पद्धतींनी करू शकत नाही." या चर्चेत असा निष्कर्ष काढण्यात आला की, यासाठी आपल्याला अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक धोरणे, उपचारांच्या परिणामांचे अचूक मोजमाप आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवलेली डिजिटल साधने यांची सांगड घालणे आवश्यक आहे.

डॉ.कार्सन एंजेल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जागतिक गुणवत्ता आणि सुरक्षा दृष्टिकोनातून, 'इंटरनॅशनल सोसायटी फॉर क्वालिटी इन हेल्थ केअर' (ISQua) म्हणाले," रुग्णांची सुरक्षा हा विषय अनेक दशकांपासून चर्चेत आहे, पण आपण अद्याप अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचलेलो नाही, हे मान्य करावे लागेल. परिणामशून्य उपक्रम राबवण्याबाबत सावध करताना ते म्हणाले, "आपण केवळ सुरक्षेच्या नावाखाली प्रक्रिया आणि उपक्रमांचा अनावश्यक ढिगारा साचवण्याचा धोका निर्माण करत आहोत, ज्यामुळे प्रत्यक्ष सुरक्षिततेत कोणतीही सुधारणा होत नाही. त्यांनी नेत्यांना लोकांचे वर्तन आणि परिस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले: "लोकांनी जे करायला हवे होते ते त्यांनी का केले नाही, हे विचारू नका. त्याऐवजी, त्यांनी जे केले ते त्यांना त्या परिस्थितीत योग्य का वाटले, याचा शोध घ्या."

डॉ.अतुल मोहन कोचर, मुख्य कार्यकारी अधिकारी  नॅशनल अक्रॅडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH) म्हणाले,"रुग्णांची सुरक्षा हा केवळ तांत्रिक विषय नाही; ती एक नैतिक, सामाजिक आणि आर्थिक गरज आहे. केवळ धोरणे  आखल्याने सुरक्षिततेत सुधारणा होत नाही, तर त्या धोरणांची कार्यक्षम अंमलबजावणीच बदल घडवून आणते." रुग्णांच्या सुरक्षेबद्दलचे आपले ध्येय स्पष्ट करताना ते पुढे म्हणाले, "रुग्ण सुरक्षेच्या बाबतीत आपण महत्त्वाकांक्षी असायला हवे. रुग्णांच्या सुरक्षेचा विचार करताना 'झिरो हार्म' (शून्य हानी) हा एकमेव आकडा आपण स्वीकारला पाहिजे."

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.