वीर वाजेकर महाविद्यालयात नागरी संरक्षण दल ह्यांच्याकडून प्राथमिक पाठ्यक्रम संपन्न.

उरण : सुनिल ठाकूर

फुंडे  येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात  'आपत्ती व्यवस्थापन पाच दिवसीय कोर्स चे आयोजन केले .
उरण सारख्या औद्योगिक परिसरात आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तरुण पिढी प्रशिक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे व विद्यार्थ्यांनी ह्या कार्यशाळेचा उपयोग आपत्ती च्या प्रसंगी करून कमीत-कमी जीवित हानी होईल असे प्रयत्न करावेत असे आव्हान केले. 
आपत्ती म्हणजे काय, आपत्ति चे प्रकार ह्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना करून  आपत्ती च्या वेळेस जखमींना कसे प्रथमोपचार द्यायचे, त्यांना सुरक्षित ठिकाणी कसे न्यायचे, स्ट्रेचर नसल्यास घरगुती साहित्यातून स्ट्रेचर कसे बनवायचे व जखमींना घेऊन जायचे, जखमी व्यक्तीला कसे उचलायचे आग लागली असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ची उपाययोजना,  दोर व गाठी बद्दल सखोल माहिती देण्यात आली.
    ह्या सर्व प्रकारांची प्रात्यक्षिक दाखवून विध्यार्थ्यांकडून सराव करून घेतला गेला. आपत्तीच्या वेळेस जीव गुदमरला असेल किंवा व्यक्ती बेशुद्ध असेल किंवा हृदयाचा झटका आला असल्यास काय उपाय योजना करायची कसा प्रथमोपचार करायचा ह्याचीही सविस्तर माहीती प्रत्यक्षिकासहीत करून दिली.   
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र
नागरी संरक्षण स्वंयसेवक सभासदस्यत्व आणि ओळखपत्र शासन नियमानुसार प्रशिक्षण भत्ता. 
प्रक्षिशन सांगता समारोप प्रसंगी, रिया नाईक, निषाद मोकल, विश्वास वाघमोडे, सानिया ठाकूर , मानसी वर्तक, आकांक्षा इटकर, मयुर पाटील, स्नेहल मोकल आणि तन्वी पाटील ह्यांनी मनोगत व्यक्त करताना, मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानले, या कोर्सच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळालं .गेलेले पाचही दिवस अत्यंत शिस्तबद्ध, उपयुक्त व प्रेरणादायी ठरले. तसेच प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रथोपचार, सर्पदंश त्यावरील उपचार आणि CPR इत्यादी बद्दल प्रात्यक्षिके दाखवली, श्री. हरेश्वर ठाकूर (भारत सरकारकडून कांस्य पदक  प्राप्त, विभागीय क्षेत्ररक्षक), श्री. समीर थळी, श्री. नितेश घरत, श्री. अभिमन्यू गोवारी, श्री. दौलत पाटील, श्रीयश पाटील, विवेक बिंद, विवेक दबडे, वैष्णवी वर्तक, जान्हवी पाटील (पेण), साक्षी पाटील (पेण), आयुष मोहिते, तसेच राज्यस्तरीय TOT पाठ्यक्रम पूर्ण करून आलेल्या स्वयंसेविका रेशम कोळी, प्रणाली सकपाळ, हर्षाली म्हात्रे, कांशिता म्हात्रे ह्याच मार्गदर्शन लाभले.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.