शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, उरण तालुका – नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घेतली जिल्हाप्रमुख मा. आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट
उरण: सुनिल ठाकूर
गुरुवार, दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अंगीकृत संघटना असलेल्या शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उरण तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मनोहरशेठ भोईर, रायगड जिल्हाप्रमुख व आमदार, यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
या भेटीवेळी जिल्हा कार्यालयीन चिटणीस श्री. ओमकार विजय घरत, कक्ष उरण तालुका संघटक श्री. कुणाल अशोक पाटील, कक्ष उरण शहर प्रमुख श्री. संदीप जाधव तसेच इतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांचे मा. आमदार श्री. मनोहरशेठ भोईर, उरण तालुकाप्रमुख श्री. संतोष ठाकूर, मा. नगराध्यक्ष श्री. गणेश शिंदे आणि नगरपालिकेतील गटनेते श्री. अतुल ठाकूर यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी
मा. श्री. ओमकार विजय घरत – कक्ष जिल्हा कार्यालय चिटणीस, रायगड
श्री. कुणाल अशोक पाटील – कक्ष तालुका संघटक, उरण
श्री. संदीप जाधव – कक्ष उरण शहर प्रमुख, उरण
श्री. फतेह खान – शहर उपकक्ष प्रमुख, उरण
श्री. आकाश तेलंगे – शहर उपकक्ष प्रमुख, उरण
श्री. सचिन कदम – कक्ष कामठा विभाग प्रमुख, कामठा
श्री. तेजस म्हात्रे – द्रोणगिरी शहर प्रमुख, द्रोणगिरी
श्री. संदेश पाटील – द्रोणगिरी उपशहर प्रमुख, द्रोणगिरी
श्री. सायरस डिसूझा – जिल्हा परिषद कक्ष प्रमुख, चांजे
श्री. अमित पाटील – नवघर जिल्हा परिषद कक्ष प्रमुख, नवघर
श्री. हृतिक पाटील – नागाव पंचायत समिती कक्ष प्रमुख, नागाव
श्री. रोशन पाटील – केळवणे जिल्हा परिषद कक्ष प्रमुख, केळवणे
श्री. चेतन माळी – जिल्हा उपकक्ष प्रमुख, चाणजे
ही भेट उरण तालुक्यात ग्राहक हक्कांसाठी प्रभावी कार्य आणि संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठरली.