वीर वाजेकर कॉलेज मार्फत तु. ह. वाजेकर शाळेमध्ये निःशुल्क डोळे तपासणी शिबिर.


उरण: सुनिल ठाकूर
रयत शिक्षण संस्थेच्या वीर  वाजेकर महाविद्यालयातील हेल्थ सेंटर कमिटी व इनोव्हिजन आय हॉस्पिटल उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने तु. ह. वाजेकर शाळेमध्ये विद्यार्थी व स्टाफ यांच्यासाठी डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.यासाठी वीर वाजेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांचे मार्गदर्शन आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री बबन साळुंखे यांचे सहकार्य लाभले. आधुनिक जीवनशैली विशेषतः मोबाईल मुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्यांची वेळोवेळी तपासणी करणे आणि काळजी घेण्याची गरज आहे असे डॉक्टरांनी सांगितले.  यावेळी इनोव्हिजन आय हॉस्पिटलचे डॉ. नीरज इसरानी, तनुजा भाकरे, सुयोग वारोसे, योगिता कडू यांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करून मार्गदर्शन केले. सदर शिबिराचे एकूण १०० पेक्षा जास्त लाभार्थी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेल्थ सेंटर कमिटी चेअरमन प्रा. संतोष देसाई यांनी केले तर आभार योगेश कुलकर्णी यांनी मानले. सूत्र संचालन प्रा. एच. के. पाटील यांनी केले. डॉ. झेलम झेंडे, शिक्षिका सौ. बाबर व शाळेतील स्टाफनी शिबीर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य  केले.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.