इरफान बागवान यांची शिवसेना पक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी (अल्पसंख्यांक विभाग) निवड.
उरण: सुनिल ठाकूर
जेजुरीचे नगरीचे सुपुत्र श्री इरफान लियाकत बागवान यांची पुरंदर हवेलीचे आमदार श्री विजय बापू शिवतारे यांच्या शिफारसीने व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांची शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी (अल्पसंख्यांक विभाग) नियुक्ती करण्यात आली त्यांच्या निवडीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्षाने एक अल्पसंख्यांक चेहरा दिला आहे गेली वीस वर्षे श्री बागवान हे पक्षाच्या माध्यमातून समाजातील तळगावातील व्यक्तींना शिवसेनेच्या वतीने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत , सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक, अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे भविष्यात देखील पक्ष वाढीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करून पक्ष वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.