दिघोडे येथे तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन . पी.पी. खारपाटील कंट्रक्शन अँड कंपनीच्या वतीने होणार तलावाचे सुशोभीकरण

 उरण: सुनिल ठाकूर
गेली अनेक वर्ष बांधकाम, दुरुस्ती व मजबुतीकरण तसेच सुशोभीकरणाच्या  प्रतीक्षेत असलेल्या दिघोडे येथील तलावाच्या बांधकाम, मजबुतीकरण व  सुशोभीकरणाच्या नियोजित कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि.16)दिघोडे येथे पार पडले. चिरनेरचे प्रसिद्ध उद्योगपती पी. पी. खारपाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून  तलावाच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. या तलावाच्या सुशुभिकरणाचे काम पी.पी. खारपाटील कंट्रक्शन अँड कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे. अशी माहिती सरपंच कीर्तीनिधी ठाकूर यांनी दिली. याप्रसंगी पी.पी. खारपाटील कंट्रक्शन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्रशेठ खारपाटील, सरपंच कीर्तीनिधी ठाकूर, उपसरपंच कैलास म्हात्रे, माजी सरपंच अविनाश पाटील, माजी सरपंच पांडुरंग कोळी, माजी उपसरपंच अभिजीत पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य  संदेश पाटील,अलंकार कोळी, उज्वला म्हात्रे, अपेक्षा कासकर,  अपेक्षा पाटील, आरती कोळी, रेखा कोळी ,ग्रामविकास अधिकारी मत्स्यगंधा पाटील, माजी सरपंच एकनाथ माळी, महादेव पाटील, श्रावण घरत ,गणेश पाटील, कैलास पाटील, वर्षकेतू हसुराम ठाकूर, एकनाथ घरत, कमलाकर कोळी, कैलास पाटील, अविनाश म्हात्रे, प्रफुल्ल पाटील, सुरेश पाटील, पांडुरंग कासकर, वरूण पाटील, समाधान पाटील, रमेश कोळी, बाळाराम ठाकूर, कमलाकर कोळी, अलंकार ठाकूर, शिवदास म्हात्रे, चंद्रकांत वाणी,( माजी सरपंच) बळीराम पाटील ,एम.बी. पाटील, परशुराम पाटील, विलास पाटील, सदानंद पाटील, गजानन पाटील, विनोद माळी, सुदर्शन पाटील, मदन गोवारी, दत्ताराम कासकर अलंकार ठाकूर, दत्तात्रेय ठाकूर  तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते. या तलावाच्या सुशोभिकरणामुळे गावाची शोभा वाढणार असून, तलावातील पाण्याचा वापर येथील ग्रामस्थांना विविध प्रकारच्या कामाकरता करता येणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.