श्री स्वामी समर्थ मंदिर उलवे येथे श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या भक्ती भावाने संपन्न.

उरण : सुनिल ठाकूर 
उलवे येथील सेक्टर 8 मधील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने श्री दत्त जयंतीउत्सव सोहळा मोठ्या भक्ती भावाने विविध धार्मिक कार्यक्रमानी संपन्न झाला.
सकाळी 7 ते 9 पूजा पाठ, सकाळी 10 ते 12 पारायण, 12 वाजता दत्त जन्म,दुपारी 1 ते 4 आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 सायंकाळी 6 वाजता महाआरती रात्री 8.30 ते 10.30, 10008 महामंडलेश्वर अंबादासानंद सरस्वती महाराज बोरुडे,(अहिल्या नगर ),गायनाचार्य हभप चेतन्य महाराज बोरुडे,कृष्णा महाराज माळी,भास्कर महाराज कदम,मृदूंगा चार्य केतन महाराज घरत,यांची कीर्तन रुपी सेवा पार पडली.तर रात्री  8.30 ते 10 श्री स्वामी समर्थ प्रस्तुत भक्ती रंग कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे निवेदक रामनाथ कोळी,नम्रता गोडसे,अभिमन्यू म्हात्रे,अश्विनी,सुप्रिया होते.रात्री 8 ते 10 महाप्रसाद ने सोहळ्या ची सांगता झाल्याची माहिती श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष श्री गौरव म्हात्रे यांनी दिली.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.