लातुर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सिनियर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर.
उरण (सुनील ठाकूर):- रायगड तायक्वांडो असोसिअशन हि रायगड जिल्ह्याची अधिकृत संघटना आहे, या संघटनेला तायक्वांडो असो. ऑफ महाराष्ट्र ( मुंबई ), तायक्वांडो फेडेरेशन ऑफ इंडिया, व भारतीय ऑलिम्पिक संघाची मान्यता आहे, या अधिकृत संघटनेमार्फत रायगड तायक्वांडो असोसिअशन चे सचिव श्री सुभाष गोकुळ पाटील यांनी खालील रायगडचा संघ जाहीर केला.
मुले :- उपेंद्र महतो(५४ किलो खालील), स्मित पाटील (५८ किलो खालील), विनायक शिरके (६३ किलो खालील), शुभम पोवार (६८ किलो खालील), आर्य विनोद घाग (७४ किलो खालील), ओम टेंगले (८०किलो खालील), विशाल सानप (८७ किलो खालील), दर्शन नाईक (८७ किलो वरील),
संघ प्रशिक्षक :- श्री अनिल मधुकर म्हात्रे
मुली :- गायत्री भंडारे (४६ किलो खालील), सेजल कानेकर (४९ किलो खालील), अनन्या चितळे (५३ किलो खालील), रोहिणी कांबळे (५७ किलो खालील), तनुजा पाटील (६२ किलो खालील), जाणवी पाटील (६७ किलो खालील),
संघ प्रशिक्षक :- प्राजक्ता अंकोलेकर
व्यवस्थापक :- साहिल पालेकर
पूमसे खेळाडू- शुभम पोवार, सेजल काणेकर, सनी पासवान, रतिका अहुजा, दिनेश म्हात्रे, सोहम कुरघोडे, प्रशांत घरत, प्राजक्ता अंकोलेकर, मुग्धा भोसले, राज बादल, दक्षय ठोंबरे, तनिष कोनकर, भाग्यश्री बोंडवे, ऋतुजा तुपसुंदर
प्रशिक्षक- अक्षता पाटील
५ ते ७ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल लातुर येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय सिनियर तायक्वांडो स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडू, भारतातील शिखर संस्था तायक्वांडो ऑफ फेडेरेशन इंडिया च्या वतीने ११ ते १४ डिसेंबर २०२५ रोजी जी एम सी बालयोगी स्टेडियम हैदराबाद येथे होणार्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.