माजी विध्यार्थी संघा कडून शालेय विध्यार्थ्यांना स्वेटर वाटप.
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
उरण : सुनिल ठाकूर
दिघोडे येथील माजी विध्यार्थी संघा कडून रायगड जिल्हा परिषद शाळा दिघोडे येथील 108 विध्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.
यावेळी माजी विध्यार्थी संघा चे अध्यक्ष डॉ.राजेश घरत.उपाध्यक्ष श्री एकनाथ घरत,खजिनदार श्री वर्षकेतू ठाकूर, मुख्याधपिका सौ.राजेश्री मुंबईकर, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष मंदार पाटील,आदी सह शिक्षक वृंद,सह विध्यार्थी वर्ग उपस्थित होते.
उरण : सुनिल ठाकूर - पनवेल तालुक्यातील आणि उलवे नोडमधील बामणडोंगरी गावची अविनाश धावजी नाईक आणि हेमलता अविनाश नाईक यांची कन्या अंकिता नाईक ही नुकतीच एम. एस. (मास्टर ऑफ सर्जरी) डॉक्टर झाली. त्याबद्दल आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी तिचे घरी जाऊन पुष्पगुच्छ आणि 'सुखकर्ता' व 'परदेश प्रवासाची पंचविशी' ही पुस्तके भेट देऊन अभिनंदन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, रामदास नाईक, अरुण नाईक, प्रीतम नाईक, उत्तम कोळी, अश्विन नाईक आदी उपस्थित होते. त्यांनीही तिचे अभिनंदन केले. बामणडोंगरी गावचे तत्कालीन समाजसेवक दिवंगत धावजीशेठ गणा नाईक यांची अंकिता नाईक ही नात आहे, तर उरण-कंठवली येथील कीर्तनकार आणि नवी मुंबईत प्रसिद्ध असणारे चार्टड अकाउंटंट (सी. ए.) इ. ए. पाटील यांची ती भाची आहे. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "आगरी समाजातील मुली उच्चशिक्षण घेऊन नावलौकिक मिळवत आहेत. मुली शिकाव्यात यासाठी मी गेली अनेक वर्षे प्रयत्न करतोय आणि प्रोत्साहन देत आलो आहे. त्यामुळे आगरी समाजाची अंकिता नाईक ही तरुणी स्त्री-रोग तज्ज्ञ झाल्य...
उरण :सुनिल ठाकूर पनवेल तालुक्यातील अजीवली येथील जनता विद्या मंदिर शाळेस शाळेचे माजी विध्यार्थी तथा माजी सरपंच ह.भ.प.श्री परशुराम यांजकडून 50 एल.ई.डी.ट्यूब लाईट भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री कांबळे,ससाणे सर ,श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी कोकण दिंडी भाताण पाडा ते देवाची आळंदी अध्यक्ष ह.भ.प.परशुराम माळी,अजीवली सप्ताहा चे खजिनदार चंद्रकांत गोजे,सदस्य संतोष पाटील,शाळेचे शिपाई संजय कांबळे आदी सह शिक्षक वृंद विध्यार्थी उपस्थित होते.
उरण: सुनिल ठाकूर पुणे येथील श्री कडबे आळी तालीम मंडळ अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी चे सदस्य मा. श्री अमित गोविंदराव पळसकर ह्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा झाला. वाढदिवसा निमित्त बालमेळावा ठेऊन बाल गोपाळांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच गरजूंना ब्लैंकेट वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक संस्थेला धान्य वाटप करण्यात आले.या त्यांनी वाढदिवसा निमित्त केलेल्या स्तुत्य उपक्रमा बद्द्दल पुणे श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे मंडळाचे अध्यक्ष अमित पळसकर ह्यांचा सत्कार करण्यात आला.