न्हावा येथील मानसी भोईर सीए उत्तीर्ण महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन!

उरण : सुनिल ठाकूर
 न्हावा येथील मानसी शिवनाथ भोईर ही सीएच्या परीक्षेत नुकतीच पहिल्या प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण झाली आहे. त्याबद्दल आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी तिचे 'सुखकर्ता' बंगल्यावर अभिनंदन केले. गुणवंती शिवनाथ भोईर यांची कन्या, तर माजी सरपंच हरिश्चंद्र बाळाराम म्हात्रे यांची ती भाची आहे. 
रोटरी एज्युकेशन सोसायटीमध्ये तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण उरण एज्युकेशन सोसायटी, तर बीबीए पुणे विद्यापीठाच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात बेलापूर येथे झाले. सध्या मानसी उरण-बोरी येथे स्थायिक असून आगरी समाजातील मुलगी सीए झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.