शिक्षणाप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी आनंद मेळा चाइल्ड हेल्प फाउंडेशनचा पालघर येथे उपक्रम


मुंबई दि. 12 (सुनिल ठाकूर ) : पालघर येथील आदिवासी व शैक्षणिक दृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने चाईल्ड हेल्प फाउंडेशन यांच्यातर्फे आश्रम शाळांमध्ये आनंद मेळावा आयोजित केला होता. पालघर जिल्ह्यातील साखरे, भोपोली, आयना, ओझर, आमगाव, पाली आणि मुरबाड आश्रमशाळांमध्ये हा उपक्रम पार पडला. या उपक्रमात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. 

 या उपक्रमांतर्गत  विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांद्वारे त्यांची कला दाखवण्याची संधी मिळाली. मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन, लैंगिक समानता, चांगला आणि वाईट स्पर्श, तारुण्य आणि पोषण मधील भावनिक आणि वर्तणुकीतील बदल या विषयांवर रांगोळी काढणे, चित्रकला आणि हस्तलेखन स्पर्धांचा समावेश होता. आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या संवेदनशील बाबींबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला ज्याकडे वंचित समाजाकडून अनेकदा दुर्लक्ष केले जाते. याबाबत चाइल्ड हेल्प फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाजी वर्गीस म्हणाले की, या स्पर्धांचा उद्देश मुलांचा आत्मविश्वास आणि कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी आहे जे त्यांच्यासाठी जगात यशस्वी होण्यासाठी महत्वाचे आहेत. संस्थेचा असा विश्वास आहे की मुलांचे उज्ज्वल भविष्य एका भक्कम पायावर उभे केले जाऊ शकते जे योग्य शिक्षणाद्वारे प्राप्त केले जाऊ शकते. संस्थेतर्फे युनायटेड नेशन्सच्या शाश्वत विकास लक्ष्यच्या चौथ्या टप्प्या अंतर्गत सुमारे ४ लाख ८९ हजार ४६५ विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता शिक्षण कार्यक्रमाद्वारे शिक्षित केले गेले आहे अशी माहितीही यावेळी वर्गीस यांनी दिली.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.