जपानी तज्ञ आणि अपोलोच्या सहयोगानेनवी मुंबईत ‘कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी तंत्रज्ञान’ कार्यशाळा
उरण (सुनिल ठाकूर ): अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने एका कार्यशाळेचे आयोजन केले. हृदयाच्या १००% ब्लॉक्ड धमन्यांवरील उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी तंत्रांबाबत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमध्ये नवी मुंबई आणि आजूबाजूच्या भागातील कार्डियाक तज्ञांनी भाग घेतला होता. आजवर अनेक रुग्णांसाठी व त्यांच्या कुटुंबांसाठी दीपस्तंभ बनलेली, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या अनुभवी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट्सची टीम-कार्डिओलॉजीचे सिनियर कंसल्टंट डॉ राहुल गुप्ता,कार्डिओलॉजी सिनियर कंसल्टंट डॉ एम.व्ही. रेड्डी आणि कार्डिओलॉजी जुनियर कंसल्टंट डॉ राजेश मत्ता यांनी या कार्यशाळेचे नेतृत्व केले. जपान, साईतामामधील साईतामा सेकीशिंकाई हॉस्पिटलचे प्रसिद्ध जपानी कार्डिओलॉजिस्ट डॉ मासाहिसा यामाने यांचा सहभाग या कार्यशाळेचे खास वैशिष्ट्य ठरले.
आपले बहुमूल्य अनुभव शेयर करताना, डॉ यामाने यांनी जागतिक एकता व रुग्णांचे जीव वाचवण्याप्रती समर्पणाची भावना व्यक्त करून सर्वांना प्रेरित केले. ही कार्यशाळा फक्त वैद्यकीय प्रगतीसंदर्भात नव्हती, तर सर्वांसाठी उज्वल व जास्त निरोगी भविष्य निर्माण करण्याप्रती आमची सामुदायिक बांधिलकी व दृढ मानवी भावना देखील ठळकपणे दर्शवण्यात आली.
डॉ राहुल गुप्ता, सिनियर कन्सल्टन्ट-कार्डिओलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी या कार्यशाळेचे नेतृत्व केले ते म्हणाले,"कोरोनरी आर्टरीचा आजार भारत आणि जगभरामध्ये एक अतिशय गंभीर आरोग्य समस्या बनला आहे. या कार्यशाळेचे आयोजन हा आमची विनम्रता वाढवणारा अनुभव ठरला, या कार्यशाळेने आम्हाला आमच्या रुग्णांना कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीमध्ये नवीन प्रगतीचे लाभ देण्यासाठी सक्षम बनवले आहे. ही कमी आक्रमक वैद्यकीय प्रक्रिया फक्त मेडिकल उपचार नाही तर ही एक जीवनरेखा आहे. गंभीर कोरोनरी आर्टरी च्या तीन रुग्णांच्या आर्टरीज पूर्णपणे ब्लॉक झालेल्या होत्या, त्यांच्यावर बायपास करणे शक्य नव्हते. या उपचाराने त्यांना जगण्याची दुसरी संधी दिली. एका रुग्णाने सांगितले की, जर बायपास सर्जरी करावी लागली असती तर त्यांना त्यांचे काम सुरु ठेवता आले नसते आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर परिणाम झाला असता. ही प्रक्रिया कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही, या प्रक्रियेमुळे त्यांना त्यांची आशा व जीवन गुणवत्ता परत मिळाली आहे. त्यांच्या जीवनावर झालेला गहिरा प्रभाव व त्यांना लाभलेले समाधान यामुळे आम्हाला देखील नवी आशा व प्रेरणा मिळाली आहे. सर्वांसाठी एक निरोगी भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने ही प्रेरणा आम्हाला घेऊन जात आहे."
कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीमुळे गुंतागुंतीचा कोरोनरी आर्टरी आजार असलेल्या रुग्णांना अनेक लाभ मिळतात. यामुळे हृदयातील स्नायूंमध्ये रक्तप्रवाह पुन्हा सुरु होतो, छातीमधील वेदना कमी होतात आणि हार्ट अटॅकचा धोका देखील कमी होतो. रुग्णांची जीवन गुणवत्ता वाढते, त्यांचा ऊर्जास्तर वाढतो, छातीतील वेदना कमी होतात आणि शारीरिक हालचाली अधिक क्षमतेने करता येतात. वय वाढलेले असल्याने किंवा सह्व्याधी असल्याने बायपास सर्जरी करू शकत नाहीत अशा रुग्णांसाठी हा आशेचा किरण आहे. ओपन हार्ट सर्जरीसाठी हि कमी आक्रमक वैद्यकीय प्रक्रिया आहे, रुग्णाच्या रिकव्हरीसाठी देखील तुलनेने कमी वेळ लागतो.