शोध सुगरणीचा कोकणातील खाद्य संस्कृतीचा! 14 जुलै रोजी उरण राष्ट्रवादी पक्षा (अजित दादा गट ) तर्फे भव्य पाक कला स्पर्धेचे आयोजन
उरण (सुनिल ठाकूर ). आपल्या कोकणातील खाद्य संस्कृती चे जतन व्हावे व पाक कलेत तरबेज असणाऱ्या सुगरणी च्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने आदरणीय खासदार सुनिलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त उरण राष्ट्रवादी (अजित दादा गट ) पक्षा तर्फे रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी उरण तालुका स्तरीय भव्य पाक कला स्पर्धा 2024 चे आयोजन उरण येथील हॉटेल राम रतन येथे करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेत प्रथम क्रमांकास रेफ्रिजरेटर, द्वितीय क्रमांकास मायक्रोवेव्ह ओहन तर तृतीय क्रमांकास मिक्सर अशी बक्षिसे असून प्रत्येक सहभागी स्पर्धेकास आकर्षक भेट वस्तू देण्यात येईल.
सदर स्पर्धे साठी प्रमुख पाहुणे, कॅबिनेट मंत्री रायगड आदिती ताई तटकरे,आमदार अनिकेत तटकरे,जिल्हा अध्यक्षा .रा.कॉ. पा. सौ. उमा मुंढे, जिल्हा अध्यक्ष रा. कॉ. पा. श्री मधुकर पाटील, राष्ट्रवादी कोंगेस उरण विधानसभा अध्यक्ष श्री वैजनाथ ठाकूर,आदींची उपस्थिती लाभणार आहे तरी या स्पर्धे साठी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सौ. कुंदा ताई वैजनाथ ठाकूर, तसेच उरण शहर अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस सायमा शेख यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी इच्छुक स्पर्धकनी पूजा पाटील 98925320312, फराहीन शेख 89281878524,मिस बाह, शेख 8433513492,जागृती पाटील 7045225184 येथे संपर्क साधावा.