पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला शिवडी- न्हावा शेवा सी लिंक प्रकल्प लोकार्पण....५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांची असणार उपस्थिती; नियोजन बैठकीतून आढावा


उरण (सुनिल ठाकूर ).
- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला अटल सेतू शिवडी- न्हावा शेवा सी लिंक या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमास ५० हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगाने उलवा नोड येथे राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन आढावा बैठक पार पडली.
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या बैठकीस माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक, माजी आमदार धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, वाय. टी. देशमुख, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मोहपे, कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी महापौर कविता चौतमोल, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, खोपोली तालुकाध्यक्ष रमेश रेटरेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटील,पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, ठाणे विभाग संघटन मंत्री हेमंत म्हात्रे, राजेश मपारा, मिलिंद पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, यांच्यासह  पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.