घोडीवली कातकरी वाडी, शिरगाव, नावंढे, तालुका खालापूर येथे जातीच्या दाखल्यासाठी कँपचे यशस्वी आयोजन.
उरण (सुनिल ठाकूर ).
कोंकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आणि अपर जिल्हाधिकारी श्री सुनील थोरवे, प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली,उप विभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे आणि तहसीलदार खालापूर आयुब तांबोळी यांच्या सहकार्याने तसेच उरण सामाजिक संस्था व टाटा स्टील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळ.वार दिनांक 02/01/2024 रोजी खालापूर तालुक्यातील घोटीवली कातकरी वाडी मधील कातकरी लोकांचे जातीचे दाखले काढण्यासाठी फॉर्म्स भरून घेतले. सदरहू कॅम्प मध्ये 257 लोकांचे फॉर्म्स भरून घेतले.उरण सामाजिक संस्था उरण उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी , रायगड भूषण दत्ता गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, मनीष कातकरी, रत्नाकर घरत, टाटा स्टील फाउंडेशन तर्फे उदय गावंड, संदेश पानसरे मंडळ अधिकारी खालापूर,प्रतिक बापर्डेकर, तलाठी नावंढे , स्थानिक पातळीवर जानू वाघमारे, आदिवासी विकास निरीक्षक दळवी सर यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.