दिघोडे येथे एस. एन. स्पोर्ट्स आयोजित सरपंच चषका चा मानकरी ठरला कायरा इलेव्हन भिंगारी तर उपसरपंच चषका चा मानकरी जय हनुमान संघ खारकोपर
उरण (सुनिल ठाकूर ).दिनांक 23 डिसेंबर व 24 डिसेंबर 2023 रोजी दिघोडे हायस्कुल च्या मागील भव्य मैदानावर एस. एन. स्पोर्ट्स च्या वतीने विश्वजित ठाकूर व अभिजित ठाकूर यांनी सरपंच व उपसरपंच चषक 2023 क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.या सामन्याचे उदघाटन माजी सरपंच अविनाश पाटील यांच्या हस्ते झाले. तर उदघाटन प्रसंगी सरपंच कीर्तिनीधी ठाकूर, उपसरपंच अभिजित पाटील, सदस्य कैलास म्हात्रे, सौ. उज्वला अनंत पाटील, कैलास, संदेश पाटील, अलंकार कोळी, सौ. अपेक्षा पाटील, सौ. अपेक्षा कासकर, सौ. आरती शक्ती कोळी, सौ. रेखा नरहरी कोळी,उद्योजक सचिनशेठ घरत, कैलास पाटील, अनंत पाटील, रमेश कोळी, डॉ. राजेश घरत, एकनाथ घरत, विकास माळी, संदिप माळी, सत्यवान कोळी, अलंकार ठाकूर, राजन पाटील, शंकर कासुकर,शेकाप अध्यक्ष हितेश ठाकूर,वरुण पाटील,गजानन पाटील, आतिष पाटील, नरहरी कोळी आदी उपस्थित होते.
या सामन्या मध्ये सरपंच चषका चा मानकरी ठरला तो कायरा इलेव्हन संघ भिंगार तर उपसरपंच चषका चा मानकरी ठरला तो जय हनुमान संघ खारकोप.
सदर सामान्यचे समलोचक म्हणून निशिकांत घरत, रोशन पाटील, सागर पाटील, यांनी काम पाहिले पंच म्हणून दिपक पाटील (विंधणे ), संदिप पाटील (जासई ) यांनी काम पाहिले तर गुण लेखक म्हणून अभय ठाकुर व मंदार पाटील यांनी केले. या सामन्या मध्ये मॅन ऑफ दी सिरीज चा मानकरी ठरला कायरा इलेव्हन संघाचा कुणाल नाईक. तर उत्कृष्ट फलंदाज शेखर पाटील (खारकोपर ). उत्कृष्ट गोलंदाज आशिष (भिंगारी ), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हर्षल घरत (खार कोपर ),
सदर सामन्याच्या पारितोषिक वितरण प्रसंगी अनिकेत भगत, शक्ती कोळी,शेकाप अध्यक्ष हितेश ठाकूर, उपाध्यक्ष विनोद माळी, विलास पाटील,ग्रामपंचायत सदस्य विंधणे सुरज म्हात्रे, माजी उपसरपंच विंधणे शक्ती म्हात्रे, समाज सेवक दर्शन पाटील,जि्यांश इंटरप्रायजेस चें समाधान पाटील, समाज सेवक उलवे नोड प्रदीप म्हात्रे आदी सह एस. एन. स्पोर्ट्स खेळाडू,40 प्लस खेळाडू सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.