विकसित भारत संकल्प यात्रा शुभारंभ आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आवरे येथे शुभारंभ
उरण ( सुनिल ठाकूर ).
केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ सर्व नागरिकांना व्हावा या साठी विकसित भारत संकल्प यात्रा ची सुरुवात सर्वत्र झाली असून त्याचाच एक भाग उरण तालुक्यातील आवरे गावात आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुभारंभ झाले .
केंद्रसरकारच्या विविध योजनांचा सर्व सामान्य जनतेला एकाच ठिकाणी लाभ मिळावा या करिता सरकारने पुढाकार घेउंन ग्रामपंचायत स्तरावर कार्यानीत करण्यासाठी शुभारंभ आवरे गावापासून केला आहे .
या वेळी आमदार महेश बालदी ,उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर ,उरण तालुका महिला अध्यक्ष राणीताई म्हात्रे ,रायगड जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत ,जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत ,उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड ,उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील , करण ठाकूर, धनेश गावंड ,देवेंद्र पाटील ,आवरे सरपंच मीराबाई पाटील ,उपसरपंच चेतन गणेश म्हात्रे,हरिचंद्र गावंड ,आवरे ग्रामपंचायत सदस्य अविनाश गावंड ,अनिल म्हात्रे, स्वाती गावंड,आवरे गाव भाजप अध्यक्ष बाळागावंड , अंगणवाडी ,तलाठी ,कोतवाल ,भाजप
कार्यकर्ते ,आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट
सर्व सामन्यां पर्यंत मोदिजींच्या स्वप्नात असलेला भारत घडवू या , विकसित भारत संकल्प यात्रा आपण यशस्वी करूया व स्वागत करूया व जनतेच्या आशेचा एक किरण बनु या
------ आमदार महेश बालदी