स्वराज्य रिक्षा चालक. मालक सामाजिक संस्थे चा 7 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमानी संपन्न

उरण  (सुनिल ठाकूर ). सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील स्वराज्य रिक्षा चालक मालक समाजिक संस्था दास्तान फाटा, दिघोडे व धुतुम यांच्या सातव्या वर्धापन दिना निमित्त दिघोडे येथील हनुमान  मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 दुपारी 3 वाजतां श्री सत्यनारायणा ची महापूजा, सायंकाळी 6 वाजतां हनुमान प्रासादिक भजन मंडळ दिघोडे  बुवा हभप पांडुरंग पाटील, मृदूंग मारुती पाटील, प्रथमेश पाटील, अध्यक्ष अंबाजी म्हात्रे यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम पार पडला.सायंकाळी 7 वाजता विविध क्षेत्रात कार्य करण्याऱ्या तसेच मान्यवरांचा सत्कार समारंभ  पार पडला.
 यावेळी ऍड. सुरेश ठाकूर, ऍड. मदन गोवारी, उपोषण कर्ते अजित म्हात्रे, रामनाथ पंडित, भाजप जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, सागर घरत, निर्दोष घरत, सरपंच कीर्तीनिधी ठाकूर उपसरपंच अभिजित पाटील सदस्य कैलास म्हात्रे, सौ. उज्वला अंनत म्हात्रे, सौ. अपेक्षा आतिष पाटील, सौ. रेखा नरहरी कोळी, सौ. आरती शक्ती कोळी, सौ. अपेक्षा कासकर, माजी सरपंच एकनाथ माळी सामाजिक युवा कार्यकर्ते सुधीर बुवा पाटील, आदी सह संस्थे चें अध्यक्ष ऍड. निग्रेश पाटील उपाध्यक्ष रमण कासकर सल्लागार ऍड. किशोर ठाकूर, निलेश पाटील, आतिष पाटील सह सर्व पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.