दास्तान ते चिर्ले, रांजनपाडा ते धुतम दोन उड्डाणं पुलाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन.


उरण (सुनिल ठाकूर ).
उरण तालुक्यातील रेल्वे मार्गामुळे होणारा विलंब टाळण्यासाठी उभारण्यात आलेल्या दास्तान ते चिलें व रांजणपाडा ते धुतुम या दोन्ही उह्मणपुलांचे उद्घाटन बुधवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
    यावेळी चव्हाण यांनी गतिमान विकासासाठी व राज्याला प्रथम क्रमांकावर नेण्याचे काम या पुलाच्या उभारणीमुळे होणार आहे. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील. उरण उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर या दोन्ही मार्गांवरील उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांतून नागरिकांची सुटका होणार आहे. त्याचप्रमाणे दास्तानपासून जेएनपीटीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला हे पूल जोडले जाणार आहेत. तर उरण पूर्व विभागातील लोकांच्या दृष्टीने दास्तान फाटा ते दिघोडे हा मार्ग महत्त्वाचा आहे.
    मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल
आणि उरणला जाण्यासाठी हा मार्ग पूर्व भागातील लोकांना सोयीस्कर झाला आहे. या मार्गावर चिलें ते दास्तान यादरम्यान रेल्वेमार्ग असून जेएनपीएमधील मालवाहतुकीसाठी आणि कंटेनर वाहतुकीसाठी याचा वापर केला जाणार आहे. यामध्ये चिलें ते दास्तानपर्यंत १ हजार २५० मोटर म्हणजे जवळपास दीड किलोमीटरचा तर रांजणपाडा ते धुतुम या १ हजार १० मीटर लांबीचे उणपुल उभारण्यात आले आहेत. हे दोन्ही उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणे खाडी पूल विभागाने केले आहे. यासाठी चिलें पूल ४७.२ कोटी रुपये तर रांजणपाडा पुलाला १९ कोटींचा खर्च आला आहे.
यावेळी मावळचे खा. श्रीरंग बारणे, आ. महेश बालदी, प्रशांत ठाकूर, उद्योजक जे. एम. म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता र. रा. हांडे, भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष निळकंठ घरत, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, चंद्रकांत घरत, सुनिल पाटील,जासई विभाग अध्यक्ष गोपीनाथ म्हात्रे,समीर मढवी,ग्रामपंचायत सदस्य विंधणे सुरज हात्रे ,आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.