ई -पॉज मशीनवर ग्राहकांचे बायोमेट्रिक थंब (अंगठा) अधिप्रमाणित त्यालाच धान्य, पुरवठा विभागाची सक्ती - भरत पाटील
ई-पॉज मशीनवर ग्राहकांचे बायोमेट्रिक थंब (अंगठा) अधिप्रमाणित होईल, त्यालाच धान्य वितरण करण्यांची सक्ती केल्यामुळे, लेखी स्वरुपात हमी व यादीसह धान्य उपलब्ध करून द्यावे अन्यथा धान्य वाटप करणे शक्य नाही असे मत भरत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ई-पॉज मशीनवर बायोमेट्रिक पद्धतीने दुकानदारांना धान्य वाटप करताना येणाऱ्या शासकीय दैनंदिन अडीअडचणी तसेच आगामी सणासुदीचे दिवस लक्षात न घेता थंब (अंगठा) अधिप्रमाणित होईल, त्यालाच धान्य वितरण करण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे, याबाबत वाद निर्माण झालेला आहे. या आगामी सणासुदीच्या काळात सर्वसामान्य
लाभार्थीना शासनाच्या तांत्रिक त्रुटीमुळे धान्य व इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नसतील तर महाराष्ट्र राज्या सारख्या प्रगत राज्यात अशी परिस्थिती निर्माण होणे हे महाराष्ट्रातील जनतेचे दुर्भाग्य आहे. शासकीय परिपत्रकात धान्यापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून ऑनलाईन रेशनकार्ड धारकांच्या लोकसंख्येनुसार केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून प्रतिमहा १००% धान्य उपलब्ध होत असताना सुद्धा, संबंधित अधिकारी वर्ग अलिखित व तोंडी आदेशानुसार आपल्या मर्जीनुसार अर्थ लावून प्रत्येक वेळी बायोमेट्रिक थंबचा (अंगठा ) प्रश्न उपस्थित करून, शासनाकडून मिळणाऱ्या धान्यात कुत्रिम टंचाई निर्माण करीत आहेत, त्यामुळे धान्य वाटपात दुकानदारांना सर्वसामान्य रेशनकार्ड धारकांच्या बरोबर तोंडी संघर्ष करावा लागत आहे. शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पारदर्शकतेच्या नावाखाली दुकानदारांना वेठीस धरणे योग्य नाही, तसेच बायोमेट्रिक थंब (अंगठा) अधिप्रमाणित सक्ती नुसार धान्य वाटपासाठी, शासकीय महसूल / पुरवठा अधिका-यांनी प्राधान्य व अंत्योदय लाभार्थी रेशनकार्ड धारकांच्या अद्यावत यादया दुकानदारांना उपलब्ध करून देणे आवश्यक व गरजेचे आहे. अन्यथा आमच्या संघटनेला नाईलाजाने न्यायालयात जनहित याचिका दाखल करून दाद मागणे भाग पडेल. आगामी सणासुदीच्या दिवसांत बायोमेट्रिक थंब (अंगठा) अधिप्रमाणित होणार नाही. अशा नलाईन रेशनकार्ड धारकांना थंब (अंगठा) व्यतिरिक्त अन्य पध्दतीचा अवलंब करुन पावती द्वारे अथवा दुकानदारांच्या थंब (अंगठा) नुसार किंवा नॉमिनी मार्फत धान्याचे वाटप करण्यास हरकत नाही. कार्डधारकांचा बायोमेट्रिक थंब (अंगठा) अधिप्रमाणित होईल त्यालाच धान्य, याबद्दल शासनाचे भूमिके बाबत संबंधित अधिकान्यांनी लेखी स्वरूपात हमी व ई-पॉज मशीन सदोष सुधारित लाभार्थी यादीसह धान्य उपलब्ध करून द्यावे अन्यथा लेखी हमी जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत दुकानदारांना धान्याचे वाटप करणे शक्य होणार नाही, त्या अंतर्गत कार्डधारकांची तक्रार अथवा उपासमारी सारखे प्रसंग उद्भवल्यास शासन व प्रशासनाची जबाबदारी राहील असे प्रतिनिधी शी बोलताना रॉकेल विक्रेता बेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष शशिकांत शेळके, सेक्रेटरी भालचंद्र पगडे यांनी सांगितले आहे.