श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवामंडळ अजिवली यांचे तर्फे शाळेला ५० बेंच ची भेट
उरण (सुनिल ठाकूर ).
श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवामंडळ अजिवली यांचे वतीने विद्यालयाची गरज पाहून जनता विद्यामंदिर अजिवली व कन्या प्रशाला अजिवली ला उत्कृष्ट प्रतीचे एकुण ५० बेंच (एक लाख रुपये किंमतीचे) भेट दिले.
सदर कार्यक्रमासाठी सेवामंडळाचे मा.अध्यक्ष श्री.परशुराम माळी,विद्यमान अध्यक्ष श्री.संजय पाटील ,मा.उपाध्यक्ष श्री.रमेश माळी,मा.कार्याध्यक्ष श्री.प्रकाश म्हसकर,मा.खजिनदार श्री.गोविंद पाटील,मा.अध्यक्ष श्री.दिनेश पाटील,मा.संपर्क प्रमुख श्री.संतोष गोजे,संपर्क प्रमुख श्री.सुभाष गायकर,सदस्य श्री.गणेश पाटील,सदस्य श्री.मेघश्याम पाटील,स्कुलकमिटी सदस्य श्री.विठ्ठल गाताडे,श्री.आनंत पाटील ,श्री.दिपक ठाकुर,फॕब्रीकेटर जहिर भाई तसेच विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री.चवरे डी.बी साहेब व सर्व शिक्षक - शिक्षेकेत्तर सेवक विद्यार्थी उपस्थित होते.