वीर वाजेकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाची बोट बांधणी शैक्षणिक सहल संपन्न


उरण (सुनिल ठाकूर ).
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर  महाविद्यालय महालण विभाग फुंडे च्या प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने सातत्याने विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो त्याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांची बोट बांधणी पाहणी साठी करंजा येथे फील्ड विसीट आयोजित करण्यात आली होती. फिशरी बायोलॉजी ह्या विषयाच्या अभ्यासक्रमात बोट बिल्डिंग, बोटीचे विविध अवयव, त्याची रचना, त्याची कार्यप्रणाली व बोटीच्या उपयुक्ततेतील त्या भागाची आवश्यकता ह्याचा समावेश होतो.  हे पुस्तकी ज्ञान प्रत्यक्ष बोट बांधणी च्या ठिकाणी पाहता यावे म्हणून  सहभाग ह्याचप्राणिशास्त्र विभाग प्रमुख  डॉ. आमोद  ठक्कर यांनी त्यांचे विद्यार्थ्यांना करंजा जेट्टी येथे मोठ्या प्रमाणात बोट बांधणीचे काम चालते तिथे प्रत्यक्षात पाहणी साठी नेले. ह्यावेळेस विद्यार्थ्यांनी बोटीचे किल, हल, स्टर्न,स्टेम, गुणवाले, रडर,विंच, विंडलास, इंजिन, मोटर, व्हील हाऊस, डेक, स्टोरेज इत्यादि सर्व पाहणी केली. तसेच बोट बांधणी साठी वापरण्यात येणारे लाकूड, प्लायवूड, फायबर, मेटल इत्यादि साहित्याची पण पाहणी केली. मच्छिमारी साठी वापरण्यात येणाऱ्या पर्स सिन जाळे व ट्ररोल नेट ह्याची त्याच्या फ्लोट व सिंकर्स सहित पाहणी केली त्यावेळेस नारळी पौर्णिमा नंतर मच्छिमारीसाठी जाण्याच्या तयारीत असणारे कोळी बांधव त्यांच्या जाळ्यांची दुरुस्ती करताना पहायला मिळाले.
पुस्तकी ज्ञानाची कास धरण्याएवजी प्रत्यक्ष कृति आणि व्यवहारी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला.
फील्ड यशस्वी करण्यासाठी मा प्राचार्य डॉ पी. जी. पवार ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व प्राणिशास्त्र विभागाच्या सर्व सेवकांचे सहकार्य लाभले.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.