आगरी,कोळी,कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचा चौथा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात झाला साजरा !.


उरण (सुनिल ठाकूर ).
       संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागात वास्तव्यास असलेल्या आगरी,कोळी,कराडी, समाज्यातील माझा समाज बांधव एकत्र यावा ,एकसंघ व्हावा सोबतच आपल्या समाज्यातील रूढी - परंपरा,सण -संस्कृती,लोककला,आणि आपल्या पूर्वज्यांचा ज्वलंत इतिहास साऱ्या देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला कळावा,आपली अस्मिता आपलं अस्तित्व टिकून राहावं याच उदात्त हेतूने प्रेरित होऊन *आगरी,कोळी,कराडी* समाज्यातील विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सुशिक्षित होतकरु युवा - तरुण मंडळींच्या पुढाकारातून आपल्या हक्काची एक संघटना एक संस्था स्थापन केली ती संघटना,संस्था म्हणजेच आगरी,कोळी,कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य.  आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेलच्या सभागृहात एका भव्य अश्या कार्यक्रमाचं आयोजन करत ११ ऑगष्ट २०१९ ह्या दिवशी लावलेलं हे संघटनेचं छोटंसं रोपटं आज मात्र काहीशा कालावधीतच एका भव्य अश्या  *वटवृक्षाच्या* रूपांत फुलतानां दिसतोय बहरतानां दिसतोय.
      आज दिनांक *११ ऑगस्ट २०२३* रोजी संघटनेच्या *चौथ्या वर्धापन दिनाचं*  औचित्य साधत.संघटनेच्या माध्यमातून एक कार्य साकारलं गेलं.ते म्हणजे आपल्या समाजातील स्वकर्तुत्वाच्या बळावर सामान्य व्यक्ती ते यशस्वी व्यक्तिमत्त्व असा प्रवास करत आपल्या समाजाचं नावं मोठं करत, समाजातील युवा तरुण - तरुणींना प्रेरक ऊर्जा देणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांना..या  कार्यक्रमाकरिता आमंत्रित प्रमुख अतिथी मान्यवर भूमिपुत्रांचे कैवारी.दिवंगत दि.बा.पाटील साहेबांचे सुपुत्र  अतुल पाटील,न्युक्लिअर मेडिसीन क्षेत्रातील न्युक्लिअर मेडिसीन तज्ञ, डायरेक्टर ऑफ न्युक्लिअर मेडिसीन.डॉ. राम  पाटील .करंजाडे ग्रामपंचायतीचे विद्यमान,सरपंच .मंगेश शेलार,शिवकर ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच सामाजिक कार्यकर्ते अनिल ढवळे यांच्या शुभहस्ते आपल्या समाजातील  पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी,आर्मी जवान , डॉक्टर्स अशा विविध क्षेत्रातील . तब्बल.३० रत्नांना "समाज भूषण"  हा मानाचा पुरस्कार. देऊन गौरविण्यात आले. त्याच बरोबर चौथ्या वर्धापन दिनाच औचित्य साधत मान्यवरांच्या शुभहस्ते .आणि संघटनेच्या सदस्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज संघटनेच्या नावाच्या.शाल आणि झेंड्याचं अनावरण देखील करण्यात आले. सोबतच .संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नवीन पदभार देऊन नवीन पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती  देखील करण्यात आली.
                                 कार्यक्रमाची सुरुवात झाली ती मान्यवरांचे,स्वागत.संघटनेच्या कामोठे महिला शहर अध्यक्षा.सौ. प्राजक्ताताई गोवारी यांनी मान्यवरांचे औक्षण करून केलं तर संघटनेच्या चार वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा संघटनेचे प्रवक्ते श्री.विवेकजी भोपीयांनी आपल्या ओघावत्या भाषाशैलीत नमूद केला,कार्यक्रमाचं सूत्रसंचालन .संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष.प्रदीप पाटील यांनी अगदी सुदंररित्या केलं.तर आभार प्रदर्शनसंघटनेचे संघटक श्री. किरणपवार यांनी केले.
        कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी. अतुल पाटील,  डॉ.राम पाटील, शिवकर चे आदर्श सरपंच अनिल ढवळे, करंजाडे सरपंच श्री.मंगेशजी शेलार, सोब.समाज भूषण पुरस्काराने सन्मानित मान्यवर आणि संघटनेचे व या कार्यक्रमाचे अध्यक्ष रुपेशदादा धुमाळ,उपाध्यक्ष भारतदादा भोपी, तसेच .पनवेल,  उरण तालुका पदाधिकारी, कामोठे शहर पदाधिकारी.आणि .सर्व विभागीय पदाधिकारी, सदस्यांच्या उपस्थितीत  संघटनेचे कार्याध्यक्ष .श्री.रोहनदादा पाटील यांच्या नियोजनातून साकार झालेला हा आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य*  या संघटनेचा चौथा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.