साई मंदिर वहाळ येथे सौ. नेत्राली नारायण ठाकूर व सौ. इंद्रायणी संतोष आगलावे या बहिणींच्या हातून अन्न दानाचे पवित्र कार्य.
उरण (सुनिल ठाकूर ). उरण बेलापूर उलवे नोड साईनगर वहाळ येथील साई मंदिरात साई बाबांच्या दर्शना साठी विविध ठिकाणाहून साई भक्त येत असतात. यावेळी दर गुरुवारी साई मंदिरात देवस्थान तर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
आज गुरुवार दिनांक 3ऑगस्ट 2023 सकाळी काकड आरती व श्री नारायण बालाजी ठाकूर (खांदा कॉलनी )यांच्या हस्ते बाबांचे मंगल स्नान झाले. संध्याकाळी 6 वाजता धुपारती. सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत महाप्रसाद यावेळी चिर्ले येथील दोन बहिणी सौ. नेत्राली नारायण ठाकूर व सौ. इंद्रायणी संतोष आगलावे (खांदा कॉलनी ). यांच्या हातून अन्नदान देऊन पवित्र कार्य घडले.
संध्याकाळी 6.30 वाजता लक्ष्मण महाराज प्रासादिक भजन मंडळ गव्हाण यांचे संगीत भजन पार पडले. यामध्ये बुवा श्री गणपत म्हात्रे (धाकटा खांदा ), पखवाज चेतन पाटील (वावंजे ), चालक अनंता कोळी (गव्हाण ). यांच्या संगीत भजनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. रात्री 9 वाजता साईबाबांची शेजारती संपन्न झाली.
यावेळी साई देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष श्री. रवीशेठ पाटील, विश्वस्त श्री जगन शेठ पाटील, अनंत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. पार्वती ताई पाटील, श्री मो. का. मढवी, श्रीकांत मुंबईकर, एकनाथ ठाकूर, विश्वास पाटील, अन्नदाते सौ. नेत्राली नारायण ठाकूर, सौ इंद्रायणी संतोष आगलावे,श्री नारायण बालाजी ठाकूर, डॉक्टर संतोष नाथा आगलावे व त्यांचे परिवार आदी सह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते