महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई गोवा महामार्गावर मनसेचे आंदोलन.
पनवेल येथे झालेल्या मेळाव्यात मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली असून१७ वर्ष ह्या रस्त्याचे काम रखडले आहे. राज साहेबांनी दिलेल्या आदेशाचे पालन तसेच रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी आंदोलन करून त्या खड्ड्यात कमलाची फुले टाकून आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलना मध्ये सहभागी जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी, मंगेश वाजेकर,तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर, विभाग अध्यक्ष संदिप ठाकूर बबन ठाकूर अनिल गावंड, अभिजीत घरत, श्रीरंग म्हात्रे, जितेंद्र पाटील , समाधान गावंड, अजित ठाकूर आदी सह मनसैनिक सहभागी झाले होते.