वीर वाजेकर फुंडे कॉलेजच्या वतीने बी. एम. एस.विभागामार्फत रा. जि. प. शाळा, कोप्रोली आदिवासी वाडी मुलांना शालेय साहित्य वाटप.

उरण  (सुनिल ठाकूर ).
 रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स फुंडे कॉलेजच्या वतीने बी. एम.  एस.विभागामार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोप्रोली आदिवासी वाडी या ठिकाणी एक्स्टेंशन ऍक्टिव्हिटी घेण्यात आली. या कार्यक्रमामध्ये बी. एम.  एस.विभागमधील  सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी ह्या गरजू आदिवासी मुलांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.  या कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश म्हात्रे सर,श्री गुरुनाथ कोळी सर, श्रीमती वनिता म्हात्रे मॅडम, बी. एम.  एस.विभाग  प्रमुख प्रा. भूषण ठाकूर, प्रा. प्रियांका ठाकूर, प्रा. दिक्षिता म्हात्रे, प्रा. रेणू सरोज, उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद पवार साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.