रायगडच्या पाच खेळाडूंची आंतरराष्ट्रीय तायक्वोंडो स्पर्धेसाठी निवड.

उरण (सुनिल ठाकूर ) : दिनांक १८ ते २२ ऑगस्ट २०२३ रोजी तायक्वोंन्डो वॉन मुजु (दक्षिण कोरिया) येथे होणाऱ्या १६ जागतिक तायक्वान्डो स्पर्धेसाठी व प्रशिक्षणासाठी रायगड व नवी मुंबईतील पाच खेळाडूंची निवड झाली आहे. १) मेघा जनार्दन पाटील (एम.जी.एम कॉलेज), २) अक्षता अंकुश भगत (ए.एस.सी. कॉलेज पनवेल), ३) मयुरेश राम घरत (एम.एन.आर. पळस्पे ), ४) नंदिनी श्रीकांत गुजाले ( वाशी इंग्लिश हायस्कूल टिळक), ५) रुद्रा संजय जाधव ( क्रीस्ट चर्च स्कूल भायखला)
या स्पर्धेसाठी प्रमुख प्रशिक्षक सुभाष पाटील आंतरराष्ट्रीय पंच व ७ डान ब्लॅक बेल्ट आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अनिल म्हात्रे ३ डान ब्लॅक बेल्ट यांची निवड झाली आहे. या स्पर्धा व प्रशिक्षणासाठी वरील सर्व खेळाडूंना तायक्वॉन्डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व रायगड तायक्वॉन्डो असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवरांनी हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.