अँटी करप्शन आणि क्राईम कण्ट्रोल क्लब च्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

उरण (सुनिल ठाकूर ).
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभण्यासाठी  आपल्या कडून नेहमी  सत्कर्म घडण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे असते. दि.11/08/2023 अँटी करप्शन आणि क्राईम कण्ट्रोल क्लब च्या वतीने डहाणू तालुक्यातील वाणगाव हनुमान नगर येथील जिल्हा परिषद शाळेतील  गरीब गरजू विद्यार्थ्यांना lशैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष, श्री. विद्यासागर (सागर) ठाकूर, महाराष्ट्र सचिव कु. प्रमोदिनी आरेकर,  शाळेचे मुख्याध्यापक श्री. कपिल संखे, सह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी वर्ग  उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवली.  महाराष्ट्र अध्यक्ष श्री. विद्यासागर ठाकूर यांनी संस्थे बद्दल तसेच भ्रष्टाचार म्हणजे काय? गुन्हा म्हणजे काय व त्याच्या विरोधात कशा प्रकारे लढता येऊ शकते या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामसेविका श्रीमती.सोनाली वढे यांनी भ्रष्टाचार विरोधात आपल्याच घरा पासूनच कशी सुरुवात करायची त्या बाबत सहज सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यपक श्री
संखे  यांनी संस्थेचे, अध्यक्ष श्री. विद्यासागर ठाकूर, सचिव प्रमोदिनी आरेकर यांचेशी शाळेच्या व इतरत्र येणाऱ्या समस्या बाबत चर्चा करुन आभार मानण्यात आले व यापुढेही   असेच कार्य संस्थेतर्फे करण्यास शुभेच्छा देऊन आभार प्रकट केले. सदर कार्यक्रम पार पाडण्यास संस्थेचे  महाराष्ट्र अध्यक्ष श्री. विद्यासागर (सागर ) ठाकूर,
  संस्थेचे सचिव, प्रमोदिनी आरेकर,बोरिवली अध्यक्ष श्री. रमेश सामरा व इतर सदस्य, तसेच  मुंबई उपनगर जिल्हा अध्यक्ष (शिवसेना ) श्रीमती. एकता चव्हाण, स्वप्नाली सावंत,संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष राजन लूना याचे विषेश  सहकार्य लाभले.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.