मणिपूर वाचवा..... ज्ञानदीप सेवा मंडळ करावे हायस्कूल यांची राष्ट्रपतीना हाक.



उरण (सुनिल ठाकूर ).
 भारताचा अविभाज्य भाग असणारे मणिपूर राज्य गेले बरेच दिवस जातीय हिंसाचारामध्ये  होरफळून निघत आहे. येथील महिला भगिनींवर अनन्वित अत्याचार होत आहेत. या संतापजनक आणि चीड आणणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर  भारताच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदीजी  मुर्मु यांनी स्त्रियांच्या रक्षणासाठी  पुढे यावे आणि मणिपूर वाचवावे अशा आशयाचे विनंती पत्र भारताच्या राष्ट्रपती आदरणीय  द्रौपदीजी  मुर्मु यांना लिहण्याचा अभियान ज्ञानदीप सेवा मंडळ शाळा करावे यांच्या मार्फत करण्यात आला ,शाळेचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, शाळेचे मराठी माध्यम मुख्यध्यापक श्री. प्रकाश पाटील सर आणि इंग्रजी माध्यम मुख्यध्यापक श्री. रत्नाकर तांडेल सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी ,बारावीचे विध्यार्थी आणि पालक यांची सह्यांची मोहीम घेतली. ज्ञानदीप शाळेमध्ये पूर्ण दिवस सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
विध्यार्थी आणि पालकांनी या मोहिमेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्या संतप्त भावनाही  व्यक्त केल्या.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.