पर्यटकांना खुणावतोय अक्कादेवी धरण .निसर्गरम्य ऐतिहासिक अक्कादेवी धरणावर पर्यटकांची मौजमजा.


उरण (सुनिल ठाकूर )
निसर्गाच्या कुशीत डोंगरदऱ्यात पडणारे पावसाचे पाणी खळखळ वाहत अक्कादेवी धरणात येऊन हे धरण भरून वाहू लागले आहे. उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गाव अर्थात 25 सप्टेंबर १९३० रोजीचा ब्रिटिश सत्ते विरोधात झालेला स्वातंत्र्यलढा, अक्कादेवी धरणाच्या जंगल परिसरात झाला. याच ठिकाणी असणारे हे निसर्गरम्य अक्कादेवी धरण पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. वर्षा सहलीसाठी येणारे पर्यटक दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी या धरणावर येऊन मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. अक्कादेवी धरणाजवळ आदिवासी वाडी आहे. शहरी पर्यटकांना डोंगर खोऱ्यातील आदिवासींचे जीवन कसे असते, याचे यथार्थ दर्शन त्यांना येथे  घडत आहे. निसर्गरम्य परिसर आणि धरणातून पडणारे पाणी याचा सुयोग्य मेळ या ठिकाणी गेल्यानंतर सहाजिकच अनुभवास येत असल्यामुळे धोका विरहित हे धरण आहे. संबंधित चिरनेर ग्रामपंचायत प्रशासनाने धरण क्षेत्राच्या मध्यभागी पोहण्यास सक्त मनाई केली केली असल्यामुळे , पर्यटकांना मौजमजा करण्यासाठी सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याखाली भिजून पर्यटक आपला आनंद घेत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. धरण भरून वाहत असल्याने पर्यटकांना मनसोक्त आनंद या ठिकाणी घेता  येतो.  लहान मुले ,महिला ,वयोवृद्ध व तरुणाई या सर्वांसाठी पावसाळी हंगामात हे अतिशय उत्तम ठिकाण असल्यामुळे पर्यटक या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी नेहमीच येत आहेत. वाहने पार्किंग साठी भरपूर जागाही या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच चिरनेर गावाजवळ हे धरण असल्याने, या ठिकाणी पर्यटकांना खाद्यपदार्थ देखील सहज उपलब्ध होत आहेत. धरण क्षेत्राच्या अगदी मध्यभागी दगडी बांधिव विहीर असून, या धरणाचा परिसर अत्यंत विलोभनीय व सुखावणारा आहे. ऐतिहासिक  व  तीर्थक्षेत्राचा वारसा लाभलेल्या, चिरनेर गावात पर्यटक आल्यानंतर प्रथम श्री महागणपतीचे दर्शन घेतात, तसेच स्वतंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून, अक्कादेवी धरण गाठतात. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीधर मोकल यांनी दिली.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.