शिरगाव साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात


उरण (सुनिल ठाकूर ).
श्री साईबाबा चारीटेबल ट्रस्ट च्या वतीने दरवर्षी प्रमाणे शिरगाव येथील साईबाबा मंदिरात गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  
 उत्सवानिमित्त संस्थानच्या वतीने  विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त माजी आमदार प्रकाश देवळे यांनी दिली. 
पाहटे साईबाबांच्या महाभिषेकाने उत्सवाची सुरुवात झाली.    अभंग व साई  भजनाचा कार्यक्रमाने साई नागरी दुमदुमून निघाली. सायंकाळी मंदिर आणि परिसरात साईबाबांच्या पादुकांची पालाखीरून मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत हजारो साईभक्त मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने सहभागी झाले होते. साई नामाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरणच साईमय झाले होते पालखीचे ठिकठिकाणी फटाक्याच्या अतिशबाजीत रात्रीच्या अंधारात आसमंत जणू वेगवेगळ्या रंगानी भरून गेला होता त्यामुळे मंदिर आणि परिसरचे सौंदर्य बहरले होते. ढोल ताशांच्या गजरात पालखीचे स्वागत करण्यात आले. उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर मंदिराच्या गाभाऱ्यात  चित्ताकर्षक अशी फुलांची सजावट साई भक्त राकेश मुगळे व मित्र परिवार यांनी केली त्यामुळे बाबांचा चौथरा आणखीनच शोभून दिसत होता. पावसाने दिवसभर उघडीप दिल्याने दिवसभर लाखो साईभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला व हजारो साई भक्तांनी साई महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती साई संस्थांनचे प्रमुख विश्वस्त माजी आमदार प्रकाश देवळे यांनी दिली. 
मुंबई उरण  येथून आलेल्या  पायी पालख्याचे शिरगावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. संस्थानच्या  सचिव सपना लालचंदाणी,  रवी जाधव, विभावरी जाधव, अन्नछत्राचे व्यवस्थापक जयेश मुळे, मंदिराचे व्यवस्थापक अनिल देवकर आदींनी कार्यक्रमांचे नियोजन केले. तर विजय लोखंडे, संतोष चव्हाण, मछिंद्र कापरे,  गणेश कपिले, सिद्धाजी माने,  विष्णू
 कदम, नवरतन शर्मा, हनुमान सुरनर, मंदिराचे पूजारी गिरीष गुरुजी,अरुण भंडारी. नरेंद्र डावरे, पंकज पांडे, प्रसाद पाठक, सुनिल केसकर आदींचे सहकार्य लाभले.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.